1. सर्व्‍हे क्रमांक/गट क्रमांक /खसरा क्रमांक योग्‍य लिहले आहेत का ?
  2. निरंक (Blank) गाव नमुना 7/12 (सातबारा) गावात नाही ना ?
  3. बंद असलेल्‍या गाव नमुना 7/12 (सातबारा) ची यादी बरोबर आहे का ?
  4. एकूण खातेदारांची संख्‍या खातेप्रकार निहाय बरोबर आहे का ?
  5. गाव नमुना 7/12 (सातबारा) नसलेली अथवा निरंक क्षेत्रांची खाती गावात नाहीत ना ?
  6. प्रत्‍येक गाव नमुना 7/12 (सातबारा) वर भुधारणा पध्‍दत निवडलेली आहे का ? व भोगवटदार वर्ग 02 असलेल्‍या 7/12 साठी उपप्रकार 1 ते 14 पैकी एक निवडलेला आहे का ?
  7. संगणकीकृत Online गाव नमुना 1 ‘क’ व हस्‍तलिखित गाव नमुना 1 ‘क’ जुळतो का ?
  8. शेती क्षेत्रासाठी एकक हे.आर.चौ.मी. व बिगरशेती क्षेत्रासाठी एकक आर.चौ.मी. निवडले आहे का ?
  9. शेती क्षेत्राचा आकार 7/12 वर लिहला आहे का ? व खातेदारांच्‍या नावांसमोर त्‍यांचे क्षेत्र व आकार नमुद केले आहे का ?
  10. संयुक्‍त व सामायिक खातेप्रकारामध्‍ये एका खातेदाराच्‍या नावासमोर व समाईकात क्षेत्र व आकार नमुद  केला आहे का ?
  11. पोट खराब क्षेत्र वर्ग ‘अ’ आहे की वर्ग ‘ब’ चे व त्‍याप्रमाणे योग्‍य रकान्‍यात नमुद केले आहे का?
  12. बिगरशेती क्षेत्राच्‍या बाबत एकक आर.चौ.मी. निवडून हस्‍तलिखित 7/12 वर आर. चौ.फुट व एकर गुंठे व हे.आर.क्षेत्राचे रूपांतर आर.चौ.मी. मध्‍ये करून क्षेत्र खातेदाराच्‍या नावासमोर नमुद केले आहे का ?
  13. खातेदारांच्‍या नावासमोर क्षेत्र नमुद करून आकार नमुद केला आहे का ? व आणेवारी काढली (शुन्‍य करून) आहे का ? भोगवटदाराच्‍या सदरी असलेल्‍या नावासमोरील क्षेत्र व आकाराची बेरीज गटाचे एकूण क्षेत्र व आकाराशी जुळते का ?
  14. गाव नमुना 7/12 (सातबारा) वर खातेदाराचे नाव ज्‍या प्रमाणित फेरफार क्रमांकाने दाखल झाले आहे तो प्रमाणित फेरफार क्रमांक त्‍या खातेदाराचे पुढे लिहीला आहे का ?
  15. हस्‍तलिखित गाव नमुना 7/12 (सातबारा) वरील सर्व जुने फेरफार क्रमांक संगणकीकृत Online 7/12 वर (History) मध्‍ये घेतले आहे का ?
  16. गाव नमुना 7/12 (सातबारा) जेवढया खात्‍यामध्‍ये विभागला आहे तेवढेच खातेक्रमांक 7/12 (सातबारा) वर नमुद केले आहेत का ?
  17. एखादया खात्‍याला कंस झाल्‍या असल्‍यास संबधित खातेदाराच्‍या नावाला देखिल कंस झाला आहे ना ? किंवा खातेदाराच्‍या नावाला कंस झाला असल्‍यास खात्‍याला कंस झाला आहे ना ? खात्री करा.
  18. इतर हक्‍कात कोणत्‍याही नोंदी दुबार नोंदी नाहीत ना ? अथवा वगळलेल्‍या नाहीत ना ? याबाबत खात्री करा.
  19. गाव नमुना 7/12 (सातबारा) पिक पाहणी / पेरे पत्रक (मागील 03 वर्षाचे) 2017-18 पर्यंत अद्यावत केलेले आहे का ?
  20. हस्‍तलिखित गाव नमुना 7/12 (सातबारा) प्रमाणे पिकपाहणी दुरूस्‍त केली आहे का ?
  21. जलसिंचनाची साधने, पडक्षेत्र , फळझाडे ची नावे व संख्‍या नमुद केली आहेत का ?

Zero Tolerance to Errorया तत्‍वानुसार अचुक 7/12 व 8अ तयार करणे.

1) 155 लेखी आदेश दुरूस्‍ती नुसार अचुक 7/12 व 8अ वरील  इतर दुरूस्‍ती करणेबाबत- (E-Ferfar Module फेरफार तयार करणे -प्रमाणित करणे.

2) Online 7/12 वर असलेले मानीव, काल्‍पनिक फेरफार क्रमांक ऐवजी वैध,योग्‍य, कायदेशिर, संबधित प्रमाणित फेरफार क्रमांकाने दाखल झाले आहे तो प्रमाणित फेरफार क्रमांक बदलणे. कलम 155 आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे- Online  Sec 155 Order – दुरूस्‍ती आदेशानुसार अचुक 7/12 तयार करणेबाबत-  Imaginary Mutation Number  {भोगवटदाराच्‍या नावासमोर,इतर अधिकारात,इतर हक्‍कात (History)}ोगवटदाराच्‍या े -प्रमाणित करणे)(E-Ferfar Module फेरफार तयार करणे -प्रमाणित करणे)

 

mm

By Ajay Khobragade

तलाठी तथा ग्राम अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *