• या गावात कोणताही फेरफार प्रलंबित असता कामा नये.                    (र्इ-फेरफार नोंदणीकृत/ अनोंदणीकृत/ ODU मधील फेरफार)
  • या गावातील खातामास्‍टर अद्यावत करण्‍याचे काम अगोदर पुर्ण करावे (परीपत्रक दि. 23 जून 2016)
  • या गावातील अहवाल क्रमांक 1 ते 14 निरंक असावेत/करावेत.
  • या गावात EDIT चे काम संपेपर्यंत कोणताही फेरफार घेऊ नये.

EDIT MODULE चे काम करतांना अत्‍यावश्‍यक बाबी

  • गाव नमुना 2 व तालुका नमुना 2 प्रमाणे बिगरशेती क्षेत्राचे सर्व 7/12 चे एकक आर.चौरस.मीटर. निवडावे.
  • गावातील सर्व क.जा.प. चा अंमल गाव नमुना 7/12 व गाव नमुना 1 वर देखिल करणे.
  • गाव नमुना 1 (क) प्रमाणे हस्‍तांतरणास प्रतिबंध असणा-या भोगवटदार वर्ग 2 क्षेत्राच्‍या नोंदी अद्यावत करणे.
  • गाव नमुना 1(अ) व 1 (ब) मधील जमीनींना भुधारणा पध्‍दती ‘सरकार’ निवडावी व गाव नमुना 1 (क) मधील जमीनींना ‘भोगवटदार वर्ग 02’ निवडून त्‍याचे उपप्रकार 1 ते 14 पैकी निवडावे.
  • काही हस्‍तलिखित 7/12 वर भोगवटदाराची सर्व नावे नमुद नाहीत अथवा इतर अधिकारामधील इतर वारस, कुळे, अथवा वहिवाटदार यांची नावे ‘ सर्व्‍हे नंबर प्रमाणे …….’ अशी लिहलेली दिसतात.अशा ठिकाणी मुळ अभिलेख पाहून संबधित सर्वांची नावे समाविष्‍ट करावीत.
  • बिगरशेती क्षेत्राचा आकार आपले गाव वर्ग– 1, वर्ग– 2 अथवा नागरी क्षेत्रात येते त्‍याप्रमाणे शासनाने निश्चिीत केलेल्‍या प्रमाण दराने (प्रति चौ.मी.) येणारा आकार 7/12 वर नमुद करावा.
  • भूसंपादित क्षेत्र अथवा अकृषिक परवानगीने रुपांतरीत झालेले क्षेत्र याबाबतचे कमी जास्‍त पत्रक झालेले नसल्‍यास तालुका स्‍तरावर तहसिलदार, उपअधिक्षक भुमि अभिलेख  यांनी समन्‍वये बैठक घेऊन प्रलंबित क.जा.. ची कार्यवाही पुर्ण  करावी.

 

mm

By Ajay Khobragade

तलाठी तथा ग्राम अधिकारी

One thought on “EDIT MODULE च्या कामाची पुर्वतयारी”
  1. मी लोनिकन्द पुणे येथे जनवरी 2108 ला प्लॉट खरेदी केला आहे. अजुन पर्यन्त फेरफार बदल झाला नाही मला काय करायला पाहिजे. प्रक्रिया सांगा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *