Edit Module मधील कामाचा प्राधान्‍यक्रम

  1. 1. खाता मास्‍टर चे काम पुर्ण करणे.
  2. Village Processing व bulk data sign पुर्ण करणे
  3. 1 ते 14 अहवाल निरंक करणे.
  4. Edit Module मध्‍ये खात्‍याशी संबधित दुरूस्‍त्‍या पुर्ण करून, “सर्व खात्‍याची दुरुस्‍ती प्रक्रिया पुर्ण झाली ” हे button वापरून प्रत्‍यक्ष  7/12 वर दुरुस्‍ती सुरु करणे.

5.योग्‍य भूधारणा पध्‍दत निवडणे व भोगवटादार वर्ग 02  असल्‍यास योग्‍य उपप्रकार निवडणे.

  1. स्‍थानिक स्थितीचे नाव भरणे
  2. सात बारा साठी योग्‍य क्षेत्राचे unit निवडणे.
  3. सात बारा चे क्षेत्र योग्‍यरित्‍या भरले असल्‍याची खात्री करणे.
  4. पोट खराब क्षेत्र वर्ग ‘अ’ किंवा वर्ग ‘ब’ चे आहे हे तपासून खात्री करणे.

10.कब्‍जेदार सदरी असलेल्‍या खातेदारांची नावे पहिले नाव,मधले नाव,आडनाव आणि असल्‍यास टोपण नाव याप्रमाणे भरले असल्‍याची  खात्री करावी.

11.खातेदाराच्‍या नावासमोर हस्‍तलिखित 7/12 मध्‍ये क्षेत्र नमुद असल्‍यास क्षेत्र नमुद करावे आणेवारी असल्‍यास त्‍याचे रुपांतर करुन क्षेत्र नमूद करावे. आणेवारी काढून टाकावी. असा भोगवटादार ज्‍या फेरफारान्‍वये  दाखल झाला तो फेरफार क्रमांक त्‍याच्‍या  नावासमोर नमूद करावा.

12.खातेदारांच्‍या  नावामध्‍ये  हस्‍तलिखित 7/12 वर श्री./श्रीमती./डॉ./इंजि./ कै./गं.भा./सौ./श्रीमंत अशी विशेषणे / विशेष नामे  लिहीलेली असली तरी  ती संगणकीकृत 7/12 वर घेण्‍यात येऊ नयेत.

  1. हस्‍तलिखित 7/12 वर अपार्टमेंट मधील/बिल्‍डींगमधील फलॅटच्‍या नोंदी घेण्‍यात आलेल्‍या असल्‍यास त्‍या संगणकीकृत 7/12 वर घेण्‍यात येऊ नयेत.
  2. सात बारा वर दाखल असलेले इतर फेरफार History मध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात यावेत. अनावश्‍यक फेरफार नोंदी नष्‍ट करावेत.
  3. सात बारा च्‍या इतर अधिकार अगोदर 7/12 वर असलेली सर्व खाती समाविष्‍ट असलेची खात्री करावी.
  4. इतर अधिकारात “अ.न. —च्‍या क्षेत्रावर बोजा/ अ.न.–च्‍या क्षेत्रावर जप्‍ती ” अशा नोंदीऐवजी खातेदाराचे नाव नमूद करावे.

17.इतर हक्‍कातील नोंदी  3 स्‍वतंत्र ओळींमध्‍ये  नोंदविल्‍या गेल्‍या असल्‍यास त्‍या दुरूस्‍त करून सलग लिहीण्‍यात याव्‍यात.

18.गाव नमुना 12 मध्‍ये सन 2016-17 पर्यत पिकपाहणी अद्यावत करण्‍यात  यावी.

19.फळ झाडांच्‍या व जलसिंचनाची  साधने यांच्‍या नोंदी घेण्‍यात याव्‍यात  मात्र ही साधने कोणाच्‍या मालकीची आहेत याच्‍या नोंदी घेण्‍यात येऊ नयेत.

20.गाव नमूना 12 मधून कसणा-याचे नाव व रीत हे रकाने काढून टाकलेले असल्‍याने अशा नोंदी घेण्‍यात येऊ नयेत.

mm

By Ajay Khobragade

तलाठी तथा ग्राम अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *